राजुरा २ मार्च :-हिंदू जनजागृती समिती ही समाजसहाय्य , राष्ट्रसेवा आणि धर्मकार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. सण आणि सार्वजनिक उत्सव यात होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल प्रबोधन अन जनजागृती करून ते थांबवण्यासाठी समिती प्रशासन पोलिसांना सहकार्य करते.
Hindu Janajagruti Samiti's statement to police inspectors.
दुश्म वृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सतप्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे या दिवशी बोंबा मारणे अजकट शिव्या देणे तोंडास काळे फासणे दारू पिऊन धिंगाणा घालने असे अनेक हिडीस प्रकार घडताना दिसून येतात. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या नावाखाली केवळ हिंदू सणांच्या वेळीच होळी पेटवू नका , कचऱ्याची होळी करा पुरणाची पोळी दान करा असे अशास्त्रीय तसेच धार्मिक भावना दुखावणारी उपक्रम काही नास्तिकवादी संघटनांकडून राबविण्यात येतात. यासह अमली पदार्थांचे सेवन, रेव पार्टी यासारखे युवापिढीला नासवण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. अनेक तरुण होळीच्या सुट्टीत गडकिल्ल्यांवर जाऊन मद्यपान करतात रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे ,त्यांच्या कडे पाहून अश्लील अंग विक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याची फुगे मारणे तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे ,अंडी फेकून मारणे आदी प्रकार वाढत चालले आहेत. या दिवसात फुगे मारण्याच्या प्रकारामुळे अनेक जणांचा कायमचे वैगुन्य आले आहे. भयग्रस्त वातावरणामुळे अनेक नागरिक ,स्त्रिया आणि मुली यांना घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. महिलांची सुरक्षितता आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य या दृष्टीने या घटना गंभीर आहेत. त्यामुळे पोलिसांची गस्तीपथके सिद्ध करणे विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सादर कराने अप प्रकार करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेणे तसेच होळी सनाविषयी बुद्धिभेद करून चुकीच्या व वाईट प्रचार करणाऱ्या वर कारवाई करावी सामाजिक संस्थांच्या सहाय्याने जनजागृती करणाऱ्या चळवळी राबवणे प्रबोधन पर हस्त पत्रकांचे वितरण करणे ऐतिहासिक वारसा स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी पोलीस पहारा ठेवणे आधी उपाययोजना कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे राजुरा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. यावेळी विनोद कोंगरे, सुभाष रामगिरवार, जनार्दन निकोडे, राजू काशेट्टीवार, दिलीप ढोले, बाबुराव जीवने, आदींची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment