Guinness World Recordsचा मानाचा मुकूट चंद्रपूरच्या शिरावर! ३ हजार महिलांचा लावणी विश्वविक्रम; दहा महिन्यांच्या परिश्रमांना सुवर्णमोहोर
चंद्रपूर : दहा महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर चंद्रपूरकरांच्या शिरावर जागतिक मानाचा मुकूट विराजमान झाला आहे. उत्कृष्ट महिला मंचच्या वतीने तब्बल ३ हजार महिलांनी आणि विद्यार्थिनींनी सलग वीस मिनिटे वीस लावण्यांचा नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर करत आपले नाव थेट Guinness World Recordsमध्ये नोंदविले.
चंद्रपूरमधील चांदा क्लब ग्राउंड येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक क्षण साकारला. जिल्ह्यातील १९ शाळांतील विद्यार्थिनी तसेच महिलांनी एकसुरात सादर केलेल्या लावण्यांनी उपस्थितांची मने जिंकली आणि चंद्रपूरचे नाव जागतिक पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय शोभाताई फडणवीस तर उद्घाटक म्हणून माननीय रवींद्रजी शिंदे उपस्थित होते. जपानहून आलेल्या सोनिया यूशिरोगोची यांनी अधिकृत ऍडज्युडिकेटर म्हणून विक्रमाची घोषणा केली.
या भव्य सोहळ्याच्या यशामागे मंचाच्या अध्यक्षा छबुताई वैरागडे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व ठळकपणे जाणवले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेटचे प्रायोजक श्री पांडुरंग आंबटकर यांची उपस्थितीही महत्त्वपूर्ण ठरली.
गेल्या दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. पुण्याचे नामवंत नृत्यदिग्दर्शक रत्नाकर शेळके यांनी चंद्रपूरातील जवळपास शंभर नृत्यदिग्दर्शकांना प्रशिक्षण देत या विश्वविक्रमाची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर प्रशिक्षकांनी शाळांमधील विद्यार्थिनी तसेच महिलांना सिद्ध केले.
कार्यक्रमाला माननीय रवींद्रजी शिंदे, स्मिताताई जीवतोड़े, विनोदजी दत्तात्रय, ममता बजाज, संजय वासाडे, प्रशांतजी बोराडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रज्ञा जीवनकर, नौशादभाई, प्रा. निलेश बेलखेडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छबुताई वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी कार्लेकर, सोनाली धनमने, मेघा आंदणकर, प्रीती बल्लावर, सारिका बोराडे, स्नेहा काळे, नंदराज जीवनकर, सागर आंदणकर, ओम वैरागडे, किरण बल्की, पूजा पडोळे, वसुधा बोडखे, अर्चना सहारे, स्नेहल बांगडे, मनीषा कन्नमवार, वैशाली कन्नमवार, अर्शिया रहमान, माया खनके, मनीषा भाके, योगिता धनेवार, संध्या आतेवार, मंगला रुद्रपवार, वंदना मुनघाटे, उषा भोयर, ज्योती एकोणकर, करीना वांढरे, प्रिया खनके, सविता ढुमणे, रीना मोगरे, जयश्री मंगळूरकर, विवेक तोगावकर, परेश गहूकर, मयूर भाके, मृणाल भाके, मयूर टेकाम, जेम्स फ्रान्सिस आदींनी अथक परिश्रम घेतले.
हा विश्वविक्रम केवळ नृत्याचा नाही, तर महिला शक्ती, संघटन कौशल्य आणि जिद्दीचा जागतिक सन्मान ठरला आहे. चंद्रपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा ऐतिहासिक क्षण शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे.
0 comments:
Post a Comment