चंदनखेडा येथे बोगस डॉक्टरला अटक

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे कोणतीही वैद्यकीय पात्रता व महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना रुग्णालय थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरवर भद्रावती पोलिसांनी कारवाई केली. विश्वजीत रमाकांत बिश्वास (वय ३८, रा. चंदनखेडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी (दि. १९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी रुग्णालयातील औषधसाठा आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
Fake doctor arrested in Chandankheda
प्राप्त माहितीनुसार, चंदनखेडा येथील विश्वजीत बिश्वास हा कोणतेही वैध वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना गेल्या सहा ते सात वर्षांपासून रुग्णालय चालवून रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय पात्रता नसताना आर्थिक लाभासाठी रुग्णांवर उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आनुटकर यांना संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्याबाबत पत्र प्राप्त झाले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डॉ. संजय आनुटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रावती पोलिसांनी चंदनखेडा येथील संबंधित रुग्णालयात धाड टाकली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी रुग्णालयाची तपासणी करून तेथील औषधसाठा आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर आरोपी विश्वजीत बिश्वास याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२) व ३११(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

या कारवाईमुळे चंदनखेडा परिसरात खळबळ उडाली असून, वैद्यकीय पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment