भद्रावती तालुक्यातील घोडपेठ चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध मटका सट्ट्यावर भद्रावती पोलिसांनी कारवाई केली. ‘कल्याण’ आणि ‘राजधानी’ मटका सट्ट्याचे आकडे लिहून लोकांकडून पैसे घेत जुगार खेळविला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Adda on police radar! 'Kalyan-Rajdhani' game ruined; Case registered against bookie
दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी भद्रावती पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना, मौजा घोडपेठ येथील चौकात एका चिंचेच्या झाडाखाली मटका सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी माहितीची खातरजमा करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी ‘कल्याण’ व ‘राजधानी’ सट्टापट्टीचे आकडे लिहित असल्याच्या आरोपावरून अमरसिंग तारासिंग बावरी (वय २५, रा. लोणारा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीकडून सट्टापट्टीचे आकडे लिहिलेले तीन कागदी चिटोरे, निळ्या शाईचा एक बॉलपेन आणि ९२० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला. बॉलपेनची किंमत १० रुपये असून, रोख रकमेसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९३० रुपये आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार गोपाळ मधुकर आतकुलवार (ब.नं. २५७९) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.
कारवाई करणारे पथक
पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार प्रशांत शेंडे, देवानंद डुकरे, पोलीस शिपाई योगेश घाटोळे, खुशाल कावळे, पोलीस अंमलदार संतोष राठोड आणि महिला पोलीस अंमलदार मोनाली गारघाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवैध धंद्यांविरोधातील कारवाईमुळे घोडपेठ परिसरातील मटका सट्टेबाजीच्या प्रकारावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
0 comments:
Post a Comment