रेती चोरांचा ‘ट्रॅक्टर’ पोलिसांच्या जाळ्यात! मंगलीत धडक कारवाई; ५.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती|प्रतिनिधी l जावेद शेख -

भद्रावती तालुक्यातील मंगली परिसरात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण ५ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक सुरज सुधाकर चौधरी (वय ३४, रा. मंगली, ता. भद्रावती) याच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार देवानंद डुकरे व पोलीस पथक भद्रावती हद्दीत गस्त घालत असताना त्यांना मौजा मंगली नाल्याकडून पिरली गावाच्या दिशेने एका लाल रंगाच्या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा रचला.Police catch sand thieves' 'tractor'! Massive operation in Mangali; Goods worth Rs 5.78 lakh seized

दरम्यान, पथकाने संशयित ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह रेतीचा साठा ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ५ लाख ७८ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जप्त मुद्देमाल असा :

  • रेती : अंदाजे १ ब्रास, किंमत ८ हजार रुपये.
  • महिंद्रा युवो टेक ५८५ लाल रंगाचा ट्रॅक्टर : किंमत ५ लाख रुपये.
  • विनाक्रमांकाची लोखंडी ट्रॉली : किंमत ७० हजार रुपये.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देवानंद डुकरे करीत आहेत.

अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीमुळे महसुलाचे नुकसान होत असताना अशा प्रकारच्या कारवायांना वेग देण्याची गरज व्यक्त होत आहे. भद्रावती पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment