जावेद शेख /प्रतिनिधी भद्रावती:-पंचायत समितीच्या वतीने प.स. सभागृहात विस्तार अधिकारी प्रकाश पारखी व अधिक्षक गौतम भेले यांचा सेवानिवृत्त प्रित्यर्थ सत्कार करण्यात आला.
On behalf of PS Bhadravati, Extension Officer Prakash Parkhi and Superintendent Gautam Bhale were felicitated for their retirement.
या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी गट विकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार होते.प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी डाॅ.प्रकाश महाकाळकर, विस्तार अधिकारी प्रणाली भागवत,सत्कार मुतिॅ विस्तार अधिकारी प्रकाश पारखी,अधिक्षक गौतम भेले,ग्रामपंचायत अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश खरवडे,प्रमोद ढोरे होते.यावेळी पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने नियत वयोमानानुसार झाल्याबद्दल व सेवाकाळात लोकाभिमुख कार्याबद्दल विस्तार अधिकारी प्रकाश पारखी,अधिक्षक गौतम भेले यांचा प्रमुख अतिथीच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.बंडुआकनुरवार,डॉ.प्रकाश महाकाळकर, प्रणाली भागवत,प्रमोद ढोरे,प्रकाश खरवडे,हेंमत मेहर,सत्कारमुतीॅ प्रकाश पारखी,गौतम भेले यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुशिल शिंदे आभार चंद्रपूर नगराळे यांनी केले.
0 comments:
Post a Comment