Ads

“जुनी पेन्शन द्या, वेतनत्रुटी दूर करा!” — लिपिक संवर्गाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा“

“जुनी पेन्शन द्या, वेतनत्रुटी दूर करा!” — लिपिक संवर्गाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
  चंद्रपूर :-
चौथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित असलेल्या वेतनत्रुटी तात्काळ दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, पदनामात बदल करावा, पदोन्नतीची साखळी कमी करावी आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. २३) लिपिक संवर्गातील शेकडो कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
“Give old pension, eliminate salary discrepancies!” — Clerical cadre stages protest at District Collectorate
मोर्चात जिल्हाभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “जुनी पेन्शन हक्काची, नाही कुणाच्या बापाची”, “वेतनत्रुटी दूर करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गौरवकुमार पाटील, जलसंपदा विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश गेडेकर, जिल्हा परिषद महिला कर्मचारी संघटनेच्या शाहीम शेख, मिलिंद धोटे, सुनील पिंपळकर, कालिदास शेंडे, महेश भुर्तेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित करताना शासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त केला. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीतील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
दरम्यान, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ फेब्रुवारीपासून लिपिक संवर्गाने कामबंद व असहकार आंदोलन सुरू केले आहे. सोमवारपासून (दि. २३) बेमुदत संप पुकारण्यात आला असून, या आंदोलनामुळे शासकीय कार्यालयांतील कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जलसंपदा विभागातील पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागानेही आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले आहे. लिपिक संवर्गाच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment