राजुरा(प्रतिनिधी)-
राजुरा वनपरिक्षेत्राचे मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वे बल्हारशाह काजीपेट डाऊन लाईनवर 152/26 या क्रमांकाचे खांब जवळ रेल्वेच्या धडकेत 5 वर्षीय नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला वारंवार या क्षेत्रात रेल्वेमुळे वन्यजीवांचे बळी जात असल्याने ही चिंताजनक बाब आहेAnother leopard killed in train collision?
आज दुपारी साडे बाराचे सुमारास रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्याने वन विभागास दिली माहिती मिळताच वन कर्मचारी,पशुवैद्यकीय अधिकारी घटना स्थळी पोहचून पंचनामा केला प्राथमिक अंदाजावरून रेल्वेची बिबटयाच्या डोक्यावर जबर प्रहार बसल्याने न्यूरॉसरजिकल शॉक बसून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते हा बिबट अंदाजे 5 वर्षांचा नर असून इतर पूर्ण अवयव शाबूत आहेत शवविच्छेदन अहवाल नंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे वनाधिकारी यांनी सांगितले
0 comments:
Post a Comment