Ads

शेगाव पोलीस यांचा गर्भपात प्रकरणातील बोगस डॉ. विश्वास याचे वर गुन्हा दाखल.

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
चार दिवस आधी शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील साखरा येथे गळ फास घेतलेल्या महिलेचे हत्या की आत्महत्या याचा शोध सुरू असताना संबंधित महिलेच्या कुटुंबीयातील वडील आणि बहिणींनी  मृत महिला मयुरी व साखरा येथील महेश यांचे प्रेम संबंध होते त्यातून ती गर्भवती राहिली त्यानंतर  महेश याने तिच्यावर गर्भपात साठी प्रेशर आणले कुटुंबीयांच्या विरोधानंतर महेश याने मयुरी सोबत लग्न लावून घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसात शेगाव येथील डॉक्टर विश्वास यांच्याकडे गर्भपात केल्याचा आरोप केला होता. Shegaon Police registers case against bogus Dr. Vishwas in abortion case.त्यावरून पोलीस विभाग शेगाव येथील पि.एस. आई. सुमित कांबळे. पो.शि. ज्ञानेश्वर केकान, आरोग्य विभाग वरोरा यांचे तालुका वैद्यकीय अधिकारी  बोरकर, नायाब तहसीलदार लोखंडे, औषध निर्माण अधिकारी  अश्विनी गेडाम, शेगाव पि.एच.सी. येथील डॉ. शेख , डॉ. झाडे, डॉ. बोबडे यांचे टीमने  काल सायंकाळी संबंधित गुन्ह्यात  सहभागी असलेला बोगस डॉक्टर विश्वास यांच्या बोगस दवाखान्यावर धाड मारून अवैध औषध साठा, शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे शास्त्र, मानवी  उत्तेजना वाढवणारे प्रतिबंधित औषध साठा जप्त करून शेगाव पोलिसांना फिर्याद दिली व पोलीस शेगाव यांनी समोरील कारवाई सुरू केली असता डॉक्टर विश्वास हा शेगाव मधून फरार झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. 
 त्यावरून शेगाव पोलीस यांनी डॉक्टर विश्वास याला फरारीत घोषित करून पुढील चौकशी सुरू केलेली आहे. 

ज्यावेळी संपूर्ण चौकशी सुरू होती त्यावेळी डॉक्टर विश्वास हा त्याचे दवाखान्यातच  हजर होता.  पंचनामा पूर्ण झाल्यानंतर तो तिथून पसार झाल्याकारणाने तो स्वतः पसार झाला की यामागे कुणाचा हात आहे.  अशा उलट सुलट चर्चांना शेगाव परिसरात उधान आले आहे. व शेगाव पोलीस चक्र फिरवून कारवाई करतात हे पाहणे विशेष ठरणार आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment