चंद्रपूर :-आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारशा शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरीच्या दुकानांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत मा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बल्लारशा यांना निवेदन देण्यात आले.
MNS taluka president Kalpana Potarlawar submitted a statement to the police against illegal online lottery
निवेदनामध्ये शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरीमुळे युवक, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून हा बेकायदेशीर व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ काळबांडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश भाऊ वासलवार, शहराध्यक्ष पियुष धुपे, वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नवाब शेख, मनसैनिक शालूताई जोगे, जयश्री जोगे, शिखाताई दास आणि शशिकला जोगे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment