Ads

वरोरा येथे कारगिल विजयदीन साजरा Kargil Vijay Deen celebrated in Warora

वरोरा :-वरोरा येथील स्थानिक आजी, माजी सैनिक, पैगाम सामाजिक साहित्य मंडळ, मोरेश्वररावं टेमर्डे चारिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित कारगिल विजय दिन दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आला.वरोरा येथील शहीद योगेश डाहुले चौकात शहीद स्मारकसमोर दीप प्रज्वलन करून प्रभात फेरी काढण्यात आली वरोरा येथील शाळा, महाविद्यालयातील विध्यार्थांनी यात सहभाग घेतला.Kargil Vijay Deen celebrated in Warora
सायंकाळी देशभक्तीपर गीतांवर आधारित विद्यार्थांची बहारदार नृत्य स्पर्धा, आणि मान्यवारांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला यात प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवताळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       कारगिल च्या युद्ध भूमिवर आपल्या देशातील विर सैनिकांनी गजवलेल्या शौर्याची आठवण येणाऱ्या पिढीला सतत रहावी यासाठी अशा राष्ट्रभाक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वरोरा येथील सामाजिक संस्था, आजी माजी सैनिकांच्या संघटना दरवर्षी कारगिल विजय दिवस हा राष्ट्रभक्तीचा सोहळा साजरा करतात.
ह्या कार्यक्रमाला वरोरा, वणी, भद्रावती, चंद्रपूर चे माजी सैनिक, वरोरा नगरध्यक्ष अर्चना ठाकरे, भद्रावती नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी,अशोक वर्मा, जयंत टेमर्डे,सुरेश बोभाटे,प्रकाश चिकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पैगाम  सामाजिक साहित्य मंडळ, माजी सैनिक संघटना,एअरबोर्न ट्रेनींग सेंटर, जयजवान जयकिसान संघटना, बेस्ट सिक्युरिटी एजन्सी यांनी पुढाकार घेतला. परिसरातील बऱ्याच नागरिकांनी यात  सहभाग घेतला.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment