Ads

🚨 धडाकेबाज कारवाई! LCBच्या थरारक पाठलागानंतर ३५ गोवंशांची सुटका; २२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर | प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडाकेबाज कारवाई करत ३५ गोवंशांची अमानुष वाहतुकीतून सुटका केली. पोलिसांनी धाडसी पाठलाग करून १५ लाख रुपये किमतीचा १० चक्का ट्रक, ३५ गोवंश आणि दोन मोबाईल असा एकूण २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.Blasting action! 35 cows rescued after thrilling chase by LCB; Property worth Rs 22.35 lakh seized
४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १० चक्का ट्रकमधून अवैधरीत्या गोवंशांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पडोली परिसरात नाकाबंदी केली.
संशयित टाटा ट्रक क्रमांक MH 31 CV 0817 नाकाबंदीजवळ येताच पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने पोलिसांचा इशारा धुडकावून ट्रक भरधाव वेगाने भद्रावतीच्या दिशेने पळवून नेला. त्यानंतर LCB पथकाने ट्रकचा थरारक पाठलाग सुरू केला.
अनेक किलोमीटरच्या पाठलागानंतर जुना सुमठाणा, सब स्टेशन पॉवर ग्रिड, भद्रावती येथे पोलिसांनी ट्रकला घेराव घालत ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ३१ गायी आणि ४ बैल, असे एकूण ३५ गोवंश अत्यंत दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने डांबून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व गोवंशांची सुरक्षित सुटका केली.
या कारवाईत भुषण ओमकार तरारे (२४, रा. आझादनगर, कामठी, नागपूर) आणि सयद जसिन सयद असलम (३३, रा. ताजबाग चौक, नागपूर) यांना अटक करण्यात आली. तर राकेशकुमार यावकराम टेकाम आणि मोसिन हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
२२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी कारवाईदरम्यान १५ लाख रुपये किमतीचा १० चक्का टाटा ट्रक, १७ लाख रुपये किमतीचे ३५ गोवंश आणि ३५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट, असा एकूण २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९६० तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment