Ads

वाघाच्या हल्यात बैल ठार.टेकाडी दिक्षीत येथील घटना,शेतकऱ्याचे नुकसान.

भद्रावती. जावेद शेख:-
शेतात चरत असलेल्या दोन बैलांपैकी एका बैलावर वाघाने हल्ला करुन त्याला ठार मारल्याची घटना तालुक्यातील टेकाडी दिक्षीत येथे दिनांक २९ रोज बुधवारला दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.यात शेतकऱ्याचे एक लक्ष विस हजिर रुपयांचे नुकसान झाले असुन ऐन हंगामात एक बैल मृत्युमुखी पडल्यामुळे पुढील शेतीहंगाम कसा करावा हा प्रश्न सदर शेतकऱ्यापुढे पडला आहे.
Bull killed in tiger attack. Incident at Tekadi Dixit, farmer's loss.
या घटनेची तक्रार भद्रावती वनविभागाला करण्यात आली असुन याची त्वरीत नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे. टेकाडी दिक्षीत येथील शेतकरी पंढरी शिवराम गायकवाड यांचे बैल शेतात चरत होते.दबा धरुन बसलेल्या वाघाने एका बैलावर हल्ला करुन त्याला ठार केले.यावेळी गायकवाड यांनी आरडाओरड केली मात्र वाघ त्यांचेवर गुरगुरला त्यानंतर त्यांनी मदतीला इतर गावखऱ्यांना बोलावले व आरडाओरड केल्यानंतर वाघ पळून गेला. घटनेची तक्रार वनविभागाला करण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मृत बैलाची किंमत एख लक्ष विस हजार सांगण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment