भद्रावती | जावेद शेख
भद्रावती वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलोत, बीट वनरक्षक संदीप पारवे आणि वनमजूर ललित नागपुरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ₹२० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही धडक कारवाई चंद्रपूर एसीबीच्या पथकाने भद्रावती येथील वनविभागाच्या कार्यालयात केली."Bribery trap in the Forest Department! Field Assistant, Beat Forest Guard and Forest Labourer in the ACB's net"
माहितीनुसार, वनविभागाने एका ट्रॅक्टरवर कारवाई करून तो जप्त केला होता. संबंधित ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलोत आणि बीट वनरक्षक संदीप पारवे यांनी ट्रॅक्टर मालकाकडे ₹२० हजारांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची गोपनीय पडताळणी केल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानुसार, वनमजूर ललित नागपुरे याच्या माध्यमातून लाचेची रक्कम स्वीकारण्यात येत असताना पथकाने तिघांनाही रंगेहात पकडले.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
0 comments:
Post a Comment