Ads

चंदनखेडा येथे SMART प्रकल्पांतर्गत आधुनिक गोडाऊन उपप्रकल्पाचे आज उद्घाटन

चंदनखेडा येथे SMART प्रकल्पांतर्गत आधुनिक गोडाऊन उपप्रकल्पाचे आज उद्घाटन

भद्रावती प्रतिनिधी : जावेद शेख
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत चंदनखेडा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, चंदनखेडा ता. भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या आधुनिक गोडाऊन उपप्रकल्पाचे तसेच वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक केलेल्या शेतमालाच्या प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, दि. 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे.
Modern godown sub-project under SMART project inaugurated at Chandankheda today
         या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते होणार असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकररावजी तोटावार, नविनजी कुमार.  जिल्हा व्यवस्थापक प्रदीपजी कातोडे, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिनखेडे, चंदनखेडा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा स्नेहल सुधीर मुडेवार, विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, प्रकल्प संचालक आत्मा तथा SMART प्रकल्प अंमलबजावणी कक्ष अरुणजी कुसळकर, नोडल अधिकारी SMART गणेशजी मादेवार तसेच तालुका कृषी अधिकारी सुशीलजी आडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
          SMART प्रकल्पाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या गोडाऊनमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची सुरक्षित व आधुनिक पद्धतीने साठवणूक करता येणार आहे. तसेच योग्य बाजारभाव मिळेपर्यंत माल साठवून ठेवण्याची सुविधा, साठवलेल्या मालावर आर्थिक सहाय्य मिळविण्याची संधी आणि शेतीमालाला अधिक मूल्य मिळण्यास मदत होणार आहे. चंदनखेडा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, साठवणुकीतील नुकसान कमी करणे आणि शाश्वत कृषी विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या उद्घाटन सोहळ्यास शेतकरी, सभासद आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कंपनीच्या संचालक मंडळाने केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment