Ads

🎴 भद्रावतीत मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा; ९ जुगारी ताब्यात, ₹३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

भद्रावती प्रतिनिधी| जावेद शेख:-
भद्रावती शहरातील नवीन भाजी मंडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून ९ जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत ५ मोटारसायकली, ८ मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ₹३,५२,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 Police conduct a daring midnight raid on a gambling den in Bhadravati; 9 gamblers arrested, cash worth ₹3.52 lakh seized!
पोलिसांना १४ जुलै २०२६ रोजी रात्री मुखबिरामार्फत नवीन भाजी मंडी परिसरात काही जण पैशावर हार-जीतचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. यावेळी राजू कनोजे, सुरज सोनवणे, सोनू शेंडे, मंगेश खंडाळकर, राहुल हटकर, रवि विधाते, शुभम पचारे, योगेश शिंदे आणि अनिल निंबाळकर यांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपींची अंगझडती व घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ₹३,५२,७०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ६८३/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment