Ads

राजुरा नवीन बसस्थानक येथे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न.

राजुरा, दि.१४ जुलै 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त १४ जुलै रोजी राज्यभर राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाअंतर्गत राजुरा नवीन बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राकेश बोधे, आगार व्यवस्थापक, राजुरा उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, आदर्श शाळा, तसेच स्वप्नील मोहूर्ले, नगरसेवक, नगर परिषद राजुरा यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले व पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
यावेळी प्रमुख अतिथींनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैभव धाडसे (वाहतूक निरीक्षक), अरविंद ठमके (वरिष्ठ लिपीक), माणिक बोबडे (वाहतूक नियंत्रक), हरिदास ठाकरे (वाहतूक नियंत्रक) आणि लक्ष्मी बोपचे (शिपाई), राजुरा आगार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमात ॲड. यादवराव कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारची वृक्षांची रोपे लावली.
एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या हरित उपक्रमामुळे परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. उपस्थितांनी "एक झाड लावा, पर्यावरण वाचवा" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment