Ads

सिंदेवाहीत बिअरप्रेमींची आर्थिक पिळवणूक? MRP पेक्षा जादा दराने बिअर विक्रीचे आरोप; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही --
सिंदेवाही शहरातील काही बिअर शॉपींमध्ये बिअरच्या बाटल्यांवर छापील कमाल किरकोळ किंमत (MRP) पेक्षा प्रति बाटली 10 ते 20 रुपये अधिक आकारले जात असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.Sindevahi beer lovers being financially exploited? Allegations of selling beer at a price higher than MRP; Demand for action from the administration
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त रकमेबाबत विचारणा केली असता काही दुकानदार "कूलिंग चार्ज" म्हणून पैसे घेत असल्याचे सांगतात. मात्र, बिअर कंपन्यांकडून शीतकरणासाठी स्वतंत्र मार्जिन दिले जात असल्याचा दावा ग्राहकांकडून करण्यात येत असून, तरीही अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याने ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, सिंदेवाहीतील मुख्य चौक परिसरातील एका बिअर शॉपीमध्ये किंगफिशर बिअरच्या प्रत्येक बाटलीवर तब्बल 20 रुपये अतिरिक्त आकारले जात असल्याचा आरोप एका ग्राहकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर केला आहे. इतर काही दुकानांमध्येही प्रति बाटली 10 रुपये अधिक घेतले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उत्पादन शुल्क विभाग, ग्राहक संरक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाने सखोल चौकशी करून, MRP पेक्षा जादा दर आकारला जात असल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक आणि नागरिकांकडून होत आहे.
ग्राहकाने तक्रार  ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा -सिंदेवाही  यांच्याकडे केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment