Ads

शासकीय कामाचे कंत्राट व नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; मुख्य आरोपी अटकेत

भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :-
शासकीय कामाचे कंत्राट तसेच नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळल्या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन वसंतराव मत्ते रा.खराटी.तह.वणी जिल्हा.यवतमाळ याला अटक केली आहे.
Fraud of lakhs of rupees by promising government work contracts and jobs; Main accused arrested
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 558/2026 अंतर्गत कलम ४२०  नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेनंतर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्यालाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, त्यानंतर या टोळक्यांचे अधिक धागेदोरे उघडकीस येईल,अशी माहिती पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी दिली.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक (API) संजय मिश्रा यांच्या पथकाकडून सुरू आहे. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे अशाच प्रकारच्या इतर अनेक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच भद्रावती शहरातील अनेक नागरिकांचीही या टोळीने फसवणूक केली असल्याने सांगण्यात आले.

ही कारवाई भद्रावती येथील प्रशांत राम पेटकुले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment