भद्रावती | प्रतिनिधी। जावेद शेख :
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून आणली जात असलेली विदेशी दारूची खेप पकडली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदोरी टी-पॉइंट येथे सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. या धाडीत 5 लाख 15 हजार 858 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
"Liquor Highway Racket from Madhya Pradesh Busted! LCB Strikes in Warora; Liquor and Assets Worth ₹5.15 Lakh Seized."
पोलिसांनी केलेल्या तपासात 29 पेट्यांमध्ये (353 बाटल्या, प्रत्येकी 750 मिली) भरलेली विदेशी दारू, दारू वाहतुकीसाठी वापरलेली टोयोटा इटिओस (MH-01-BT-1087) आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ₹5,15,858 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी नरेंद्र जितेंद्र भाट (31, रा. जालनगर, चंद्रपूर) व दामिनी नरेंद्र भाट (रा. जालनगर, चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली असून सूर्या उर्फ सूरज परसंगे (रा. जालनगर, चंद्रपूर) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई)(अ) व 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
"मध्यप्रदेशातून चंद्रपुरात दारू तस्करीचा डाव... पण LCB च्या सापळ्यात पूर्णपणे फसला!" अशी चर्चा या कारवाईनंतर जिल्ह्यात सुरू आहे.
0 comments:
Post a Comment