Ads

🐆 भद्रावतीत बिबट्याचा थरार! शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; झुंज देत वाचवला जीव, नागरिकांमध्ये भीतीचे सावट

भद्रावती | प्रतिनिधी : जावेद शेख
भद्रावती शहर व परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, अखेर आज एका शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत बिबट्याशी झुंज दिल्याने मोठी जीवितहानी टळली.
Leopard scare in Bhadravati! Fatal attack on farmer; He saved his life by fighting, fear spreads among citizens
यापूर्वीही गौतम नगर व जिल्हा परिषद शाळेच्या मागील परिसरात बिबट्याने एका वासरासह एका वराहाची शिकार केली होती. घटनास्थळी बिबट्याचे पगमार्क व पंजांचे ठसे आढळून आले होते. त्यानंतर स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. मात्र, वन विभागाने आवश्यक ती ठोस कारवाई न केल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गौराळा रेल्वे स्टेशनजवळील शेतात काम करत असताना रवींद्र किसन बावणे यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यात बावणे यांच्या पोटाला व हाताला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांनी धाडसाने प्रतिकार करत बिबट्याशी झुंज दिली आणि स्वतःचा जीव वाचवला.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतच रवींद्र बावणे यांनी भद्रावती वन विभागाच्या कार्यालयात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते स्वतःच ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे उपचारासाठी दाखल झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर भद्रावती शहरासह आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. नागरिकांनी सकाळी व सायंकाळी शेतात किंवा निर्जन भागात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच वन विभागाने विलंब न लावता पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment