भद्रावती | प्रतिनिधी जावेद शेख : भद्रावती पोलिसांनी गुंगीकारक औषधीद्रव्य प्रकरणात मोठी कारवाई करत राजस्थानातून मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या आंतरराज्यीय साखळीचा मोठा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे.
पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक ६३२/२०२६ अंतर्गत गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ०३ जून २०२६ रोजी भद्रावती येथील जमघट हॉटेल समोर मध्यरात्री ००:४० ते ०२:१५ या वेळेत ही घटना घडली. त्यानंतर सकाळी ०५:५५ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
फिर्यादीची तक्रार:
फिर्यादी विनोद गजानन भुरले (वय ४०, व्यवसाय नोकरी, रा. चंद्रपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जमघट हॉटेल परिसरात काही इसमांकडून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली. तपासादरम्यान आरोपींकडून अंमली पदार्थ बाळगणे व विक्रीसाठी साठवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास सपोनी संजय रा. मिश्रा करीत आहेत.
तपासादरम्यान अटक आरोपी अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार याच्या चौकशीतून व तांत्रिक विश्लेषणातून आकिब जावेद उर्फ टिपू सलीम जावेद खान (वय ३०, रा. वार्ड क्र. ०२, हॉस्पिटल रोड, मारवार जंक्शन, जि. पाली, राजस्थान) याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.
यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिसांचे पथक राजस्थान राज्यात रवाना झाले. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने सखोल शोधमोहीम राबवून दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी ०८:२० वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोउपनि संतोष केदार, पोहवा संतोष येलपुरवार (२५३५), जयसिंह (२१३८) तसेच पोशि प्रेमकुमार (८१६) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
अटकेनंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी दोन दिवसांचा ट्रांझिट वारंट मिळविण्यात आला. त्यानुसार आरोपीस भद्रावती येथे आणण्यात आले असून सध्या त्याच्याकडून अंमली पदार्थांचा स्त्रोत, पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच इतर संबंधित आरोपींबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सपोनी बलराम झाडोकार यांनी तांत्रिक मदत केली.
या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
0 comments:
Post a Comment