नासिर खान/ मुल (प्रतिनिधी) :
मुल शहरात घराच्या आडोशाला सुरू असलेल्या बनावट आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू निर्मितीच्या अवैध उद्योगाचा स्थानिक गुन्हे शाखा व मुल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत तब्बल ९ लाख ८५ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे.
विश्वसनीय गुप्त माहितीनुसार, मुल येथील तोहिद शेख हा युवक महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाला साठवून ठेवून त्याची विक्री करत होता. याशिवाय तो स्वतःच्या घरातच बनावट तंबाखू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.Fake tobacco factory exposed in Mul city! Police raid — goods worth Rs 9.85 lakh seized
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि मुल पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ (वय २७, रा. ताडाळा रोड, मुल) याच्या घरावर छापा टाकला. छाप्यात तंबाखू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मशीन, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एमएच-२७ बीव्ही-२९०७ क्रमांकाची कार जप्त करण्यात आली.
कारवाईनंतर आरोपी व मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते:
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर), पोलीस निरीक्षक विजय राठोड (मुल), पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि रूपेश कुंभरे, पोलीस अंमलदार धनराज करकाडे, जंयत चुनारकर, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे, किशोर वाकाटे, दिपीका सोडणार तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचे कर्मचारी.
मुल शहरातच घराच्या आडून बनावट तंबाखू निर्मिती सुरू असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार
0 comments:
Post a Comment