Ads

ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षणातून नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग वगळल्याने सरपंच संघटना आक्रमक

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती,-
     भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षणामध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) वगळण्यात आल्याने सरपंच संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.Sarpanch organization aggressive over exclusion of other backward classes of citizens from reservation for Gram Panchayat members
        ग्रामपंचायत निवडणुका अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. शासनाने प्रथम थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले होते. मात्र सदस्य पदांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यास विलंब झाला. तब्बल सहा महिन्यांनंतर सदस्य पदांचे आरक्षण प्रसिद्ध करण्यात आले. मात्र या आरक्षणामध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) वगळून त्याऐवजी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आल्याचा आरोप सरपंच संघटनेने केला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत भद्रावती तालुका सरपंच संघटनेने या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत लागू करावे, अशी मागणी भद्रावती तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत चंदनखेडा येथील सरपंच नयन बाबाराव जांभुळे यांनी केली.
          या आंदोलनाला तालुक्यातील सुमारे ७० सरपंचांचा पाठिंबा असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सरपंच सुधाकर रोहनकर भटाडी. मनिषा रोड सरपंच बिजोनी. मंगेश भोयर सरपंच नंदोरी, शंकर रासेकर सरपंच सागरा, अनिल खडके सरपंच घोडपेठ, यांनीही या मागणीला समर्थन दर्शविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment