Ads

🚨 “सिंदेवाहीत सुगंधीत तंबाखूचा मोठा साठा उघड; मुख्य तस्कर जेरबंद, २.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त!”

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) | प्रतिनिधी :
सिंदेवाही शहरात अवैध सुगंधीत तंबाखू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ₹२,८४,८४५/- किमतीचा प्रतिबंधित तंबाखू व हुक्का शिशा साहित्य जप्त करण्यात आले आहे.“Large stash of scented tobacco discovered in Sindevahi; Main smuggler arrested, goods worth Rs 2.84 lakh seized!”
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे, सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरातील छुप्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू साठवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. या माहितीवर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली.
छाप्यादरम्यान सागर प्रमोदराव केकरे (वय ३४, रा. आझाद चौक, सिंदेवाही) याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर घेतलेल्या झडतीत महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी असलेला सुगंधीत तंबाखू व हुक्का शिशा तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या रॅकेटमागील इतर पुरवठादारांचा शोध सुरू असून, पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक  ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात, सहाय्यक पोलीस निरीक्षक  दीपक काँक्रेटवार, पोलीस उपनिरीक्षक  विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार  गणेश मोहुर्ले, पोलीस हवालदार गणेश भोयर, पोलीस हवालदार  चेतन गज्जलवार, पोलीस हवालदार  संतोष पेलपुलवार, पोलीस हवालदार  जयसिंग, पोलीस हवालदार  गुरनुले, पोलीस अंमलदार सुमित बरडे, पोलीस अंमलदार  अजित शेंडे पार पडली.
👉 सिंदेवाहीतील या धडक कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment