Ads

रेती माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती (जावेद शेख)दि. ८ जून: जिल्ह्यात वाढत्या अवैध रेती उत्खननाविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. पिपरी नदी घाटावर सुरू असलेल्या रेती चोरीवर छापा टाकत पोलिसांनी दोन ट्रॅक्टरसह तब्बल ₹10,06,240/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी सकाळी कारवाई करत नदी घाटावर सुरू असलेला अवैध रेती उपसा उघडकीस आणला. घटनास्थळी दोन इसम ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये रेती भरताना आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्परतेने त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रंजीत शंकर आत्राम (रा. चिरादेवी) व आदर्श सुभाष मिटपल्लीवार (रा. गवराळा) अशी आहेत. चौकशीत त्यांनी रेती उत्खनन हे संदिप आनंदराव नांदे (रा. पिपरी) व मोहन हनुमान ठाकरे (रा. भद्रावती) यांच्या सांगण्यावरून करत असल्याचे कबूल केले.
कारवाईदरम्यान दोन ट्रॅक्टर-ट्रॉली व त्यामधील रेती असा एकूण ₹10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 47(7), 48(8) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अप्पर पोलीस अधीक्षक कातकडे व ठाणेदार योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात एपीआय संजय मिश्रा, प्रेम बावनकर, हवालदार विजय उपरे, योगेश घुगे यांनी कारवाई केली

दरम्यान, जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाविरोधात पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सततच्या कारवायांमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

‘दि चंद्रपूर टाइम्स’चा इम्पॅक्ट:
अवैध रेती उत्खननाविरोधात ‘दि चंद्रपूर टाइम्स’ने सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, या कारवाईला त्या पाठपुराव्याचा मोठा परिणाम मानला जात आहे.
जिल्ह्यातील रेती माफियांवर पोलिसांचा वाढता दबाव कायम राहणार असल्याचे संकेत असून, आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment