Ads

“युवकांचे विचार रंगले मंचावर; ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा 2026’ला चंद्रपुरात उस्फूर्त प्रतिसाद!”

चंद्रपूर: स्वाभिमान, धैर्य आणि जनसेवा यांचा संदेश देणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण वक्त्यांना आणि विद्यार्थ्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी युवासेना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय "सडेतोड वक्तृत्व स्पर्धा – २०२६" चे आयोजन करण्यात आले होते“The thoughts of the youth came to the stage; ‘Rhetorical Competition 2026’ received a spontaneous response in Chandrapur!” "युवकांचे विचार... महाराष्ट्र घडवणार!" हा मुख्य गाभा असलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १८ स्पर्धकांनी उस्फूर्तपणे भाग घेत आपल्या सडेतोड विचारांनी आणि वाक्चातुर्याने उपस्थितांची मने जिंकली. युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे आणि युवासेना शिवसेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेवक हर्षलदादा काकडे व युवासेना राज्य विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या सूचनेनुसार युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या धडाडीच्या नेतृत्वात वरोरा नाका, नागपूर रोड येथील श्रमिक पत्रकार भवन येथे ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. तरुणाईच्या बौद्धिक आणि वैचारिक पातळीला आव्हान देण्यासाठी या स्पर्धेत 'व्हिजन महाराष्ट्र २०५०' आणि 'राजकारण आणि समाजकारण युवकांची भूमिका' हे दोन कळीचे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे अचूक व निष्पक्ष परीक्षक म्हणून आकाश कडूकर सर आणि डॉ. उज्ज्वला नगराळे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनीष जेठानी (अर्थ व बांधकाम सभापती, नगर परिषद वरोरा तथा शिवसेना जिल्हा संघटक), श्याम हेडाऊ (जिल्हा प्रतिनिधी, आधुनिक केसरी), रोहिणी पाटील (युवासेना सहसचिव, महाराष्ट्र राज्य), संदीप रियाल पटेल (महाराष्ट्र राज्य विस्तारक तथा शिवसेना नागपूर शहर प्रमुख), पीयूष आंबटकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ) आणि अ‍ॅडव्होकेट अजित पांडे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी युवासेनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. आजच्या युवकांना देशातील चालू असलेल्या परिस्थितीची आणि सामाजिक-राजकीय घडामोडींची जाण असणे अत्यंत आवश्यक आहे, आणि तो हक्काचा मंच आज युवासेनेच्या माध्यमातून तरुण-तरुणींना उपलब्ध होत आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. वक्तृत्व क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आलेल्या या स्पर्धेत अत्यंत चुरस पाहायला मिळाली, ज्यामध्ये विजेत्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

प्रथम क्रमांक (संयुक्त विजेते): हर्षल साळवे आणि प्रेम नामदेव (दोघांनाही प्रत्येकी शाल, सन्मानचिन्ह आणि १०,००0 रुपये रोख)

द्वितीय क्रमांक: विपुल बुटले (शाल, सन्मानचिन्ह आणि ५,००0 रुपये रोख)

तृतीय क्रमांक: सिद्धी अलोणी (शाल, सन्मानचिन्ह आणि ३,००0 रुपये रोख)

विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक वक्त्याला सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यासोबतच पवन नगराळे, यशपाल उर्फ बंटी कमटम (युवासेना उपजिल्हाप्रमुख), नीरज यादव, महेश शिरगिरवार, अमित मालेकर (युवासेना तालुकाप्रमुख), सागर गभने (तालुका समन्वयक), चेतन बोबडे (घुगुस शहर प्रमुख), प्रविण पेटकर (तालुका सरचिटणीस), साहिल पोरंते (उपशहरप्रमुख), श्रीकांत दडमल (उपशहरप्रमुख), विवान रामटेके व चंद्रपूर जिल्ह्यातील इतर अनेक युवासैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणाईच्या वैचारिक प्रवासाला अचूक दिशा देणाऱ्या या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण जिल्ह्यात युवासेना चंद्रपूरचे कौतुक होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment