चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर शहरात अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ने बाबुपेठ परिसरातील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल १० आरोपींना रंगेहात अटक केली आहे. ‘तीन पत्ती’च्या नावाखाली सुरू असलेला हा जुगार व्यवसाय पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. Big action! LCB raids ‘Teen Patti’ Jugar Addyawar in Babupeth – 10 people caught red-handed
मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व मा. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे LCBच्या पथकाने आंबेडकर चौक, बाबुपेठ येथील गुनवंत आवळे यांच्या घरावर अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान घराच्या खोलीत काही इसम गोलाकार बसून पैशांची मोठी बाजी लावत ‘तीन पत्ती’ जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले.
या कारवाईत गुनवंत सोमाजी आवळे याच्यासह एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मुंबई जुगार कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
‘अवैध धंद्यांना थारा नाही’
या कारवाईमुळे शहरातील जुगार अड्ड्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात पुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहतील.
0 comments:
Post a Comment