चंद्रपूर (प्रतिनिधी – जावेद शेख, भद्रावती):शहरातील घुटकला वॉर्ड परिसरात मध्यरात्री भीषण आगीची घटना घडून मोठी खळबळ उडाली. कफील हॉटेल तसेच परिसरात उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
Midnight blaze wreaks havoc in Ghutkala Ward; Kafeel Hotel gutted, Scorpio vehicle also damaged — suspected arson by unknown persons!
आग झपाट्याने पसरत असल्याने हॉटेललगत राहणारे नईम खान, आमिर खान पठाण यांच्या कुटुंबीयांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हॉटेलमधील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले असून आर्थिक नुकसान मोठे झाले आहे.
याशिवाय, जवळ उभ्या असलेल्या आयशर फोर व्हीलरवरील ताडपत्रीलाही आगीचा फटका बसला होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच एमआयएमचे नगरसेवक अझहर शेख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ धाव घेतली आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
दरम्यान, शहर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मागणी:
या आगीत झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेऊन प्रशासनाने बाधितांना तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment