जावेद शेख। भद्रावती प्रतिनिधी. —
अवैध रेती वाहतुकीवर प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत सकाळीच रेती माफियांना धक्का दिला. आज सकाळी ८.४० वाजताच्या सुमारास मंडळ अधिकारी मनोजकुमार भोयर, ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक आणि कोतवाल भारत पेंदाम यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत विनानंबर रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोधी येथील मयूर शेमभळकर (रा. पारोधी) हा अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असताना चंदणखेडा येथे त्याची गाडी पकडण्यात आली. ही कारवाई कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, पारोधी घाट पाण्याच्या टाकी परिसरात करण्यात आली.
या धडक कारवाईमुळे परिसरातील रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली असून, “दि चंद्रपुर टाइम्स”च्या रेती तस्करीविरोधातील मोहिमेमुळे प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सततच्या कारवायांमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नागरिकांकडूनही अशा कारवायांचे स्वागत होत असून, अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर कायमस्वरूपी आळा बसावा, अशी मागणी होत आहे.
0 comments:
Post a Comment