Ads

मध्यरात्री महसूल विभागाचा सर्जिकल स्ट्राइक!

जावेद शेख | प्रतिनिधी, भद्रावती:-
भद्रावती तालुक्यातील चारगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने शुक्रवारी मध्यरात्री धडक कारवाई करत तस्करांना जबर धक्का दिला. Tractor transporting illegal sand seized; stir among smugglers
गोपनीय माहितीच्या आधारे चारगाव घाटावरून रेती घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता विजासन परिसरात मंडळ अधिकारी अनिल दडमल व महसूल पथकाने सर्जिकल स्ट्राइक करत ही कारवाई केली. एक ब्रास रेती भरून येणारा बिना नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली (MH CJ 4267) तपासणीदरम्यान पकडण्यात आला. चौकशीत रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

सदर ट्रॅक्टर भद्रावतीतील शिंदे लेआउट येथील अमोल पोटे यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली. कारवाईनंतर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.
ही कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अनिल दडमल , खुशाल मस्के व ड्रायव्हर बंडू वेलफुलवार यांनी पार पाडली. या धडक कारवाईमुळे परिसरातील रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून महसूल विभागाच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

 आजची दुसरी कारवाई — प्रशासन ॲक्शन मोडवर!
भद्रावतीत महसूल विभाग सलग दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर दिसून आला असून अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment