जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
एका गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करीत वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
Revenue Department takes action against tractor transporting illegal sand. सदर कारवाई विजासन येथे चारगाव घाट येथून भरून येत असलेल्या एक ब्रास भरून असलेल्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाच्या ग्राम महसूल अधिकारी अनिल दडमल ,यांनीदिनांक .29, 5.2026. शुक्रवार रोज रात्री 10.30 वाजता दरम्यान कारवाईकरण्यात आली. ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.34 ab 0450 व ट्रॉली क्रमांक एम. एच एच Ab 9256 .वाहना तर्फे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्टर हा भीमराव गजानन ठमके राहणार गौराळा भद्रावती यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे रेतीच्या कोणत्याही प्रकारच्या परवाना नसल्याबाबत आढळले सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात ग्राम महसूल अधिकारी अनिल दडमल, खुशाल मस्के ,यांनी सदरची कारवाई करण्यात आली यामुळे रेती तस्कराचे धाबे दनानले आहे व ट्रॅक्टर तहसील कार्यालय जमा करण्यात आली
0 comments:
Post a Comment