जावेद शेख (भद्रावती प्रतिनिधी):
भद्रावती शहरात घडलेल्या लूटप्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपींना जेरबंद केले आहे. गौतम मॉल येथील रहिवासी संतोष जीवनचंद गोलेच्छा (वय ५१) यांच्यावर २५ मे २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपयांची सोन्याची चैन व लॉकेट जबरदस्तीने हिसकावून नेले होते.
घटनेदरम्यान आरोपींनी चेहऱ्यावर कापड बांधून फिर्यादीला अडवले, गाडीवरून खाली पाडले आणि धारदार तसेच लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.The thrill of robbers in Bhadravati is over! The accused who snatched a gold chain worth 35 thousand is in the police net.
या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५९७/२६ कलम ३०९ (६) भा.न्या.स. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अहद खान पठाण (वय २३) व एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून १५ ते १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व लॉकेट (किंमत ३५,००० रुपये), काळ्या रंगाची बॉक्सर मोटारसायकल (किंमत २५,००० रुपये), लोखंडी हातोडी (१०० रुपये) व चाकू (२० रुपये) असा एकूण ६०,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार नसून कौटुंबिक अडचणीमुळे गुन्हा केल्याची चर्चा सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (वरोरा) संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.तसेच पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे (स्थागुशा, चंद्रपूर), पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पो.उपनि. गजानन तुपकर, सहाय्यक पोलीस फौजदार महेन्द्र बेसरकर,पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर,जगदीश झाडे,विश्वनाथ चुदरी,
गोपाल आतकुलवार,पोलीस अंमलदार खुशाल कावळे,योगेश घाटोळे,
संतोष राठोड (पो.स्टे. भद्रावती)
यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment