Ads

भद्रावती तालुक्यात रेती चोरीचा धुमाकूळ ; “दिवसा नेता, रात्री रेती चोर?” चर्चांना उधाण

भद्रावती प्रतिनिधी,:-
भद्रावती तालुक्यातील पारोधी घाट, चारगाव घाट  जेना,परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रेती चोरी करणाऱ्यांमध्ये काही तथाकथित “पांढरपेशा” आणि “व्हाईट कॉलर” लोकांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
Sand theft rampage in Bhadravati taluka; “Leader by day, sand thief by night?” sparks debate
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसा समाजसेवा, राजकारण आणि नेतागिरीचा आव आणणारे काही जण रात्रीच्या अंधारात मात्र रेती चोरीच्या धंद्यात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. “दिवसा नेता आणि रात्री रेती चोर” अशी उपरोधिक चर्चा आता गावागावात ऐकायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, अवैध रेती वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना संबंधित यंत्रणा मात्र गप्प का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. पारोधी घाटातून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, हायवा जेसीपी ,आणि इतर वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे.
परिसरातील नागरिकांचा आरोप आहे की, काही प्रभावशाली व्यक्तींच्या राजकीय आशीर्वादामुळेच हा काळाबाजार बिनधास्त सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांची मागणी
पारोधी घाटातील अवैध रेती उपशाची तात्काळ चौकशी करावी
रात्रीच्या पहाटे सकाळपासून विशेष पथक नेमून कारवाई करावी रेती चोरीत सहभागी असलेल्या सूत्रधारांची नावे जाहीर करावीत महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी दरम्यान, “जनतेसमोर समाजसेवेचा मुखवटा आणि मागून रेती माफियागिरी” अशी चर्चा आता तालुक्यात चांगलीच रंगू लागली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment