राजुरा, ता.प्र. -
कोरोना काळात औषधी ऑनलाईन विक्रीला दिलेली मंजूरी अद्यापही कायम असून संबंधित जीआर रद्द करावा व ही ऑनलाईन औषधी विक्री परवानगी तातडीने मागे घ्यावी, या मागणीसाठी संपूर्ण देशात फार्मासिस्ट व्यापा-यांनी आंदोलन आज एक दिवशीय बंद ची घोषणा केली होती. त्याला राजुरा येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आज राजुरा येथे सर्व मेडीकल स्टोअर्स पुर्णपणे बंद होते. मात्र मेड प्लस या कंपनीचे स्टोअर सुरू होते. Strict shutdown in Rajura against online medicine sales
या आंदोलनात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्हा संघटन सचिव प्रशांजी गोठी, राजुरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश रेगुंडवार, सचिव राकेश अल्लूरवार, प्रकाश चांडक, कमल बजाज, अनिल आवारी, हितेश डाखरे, मनीष बांबोडे, मनोज सदाफळे, दिनकर काळे, नावेद अन्सारी, भूषण पांढरे, श्रीकांत निमकर, गोपाल सारडा, खुशाल ठावरी औसफ सय्यद, विनोद घाटे, वृषभ गोठी, शालिनी कुईटे, अफशा खान इत्यादी मेडीकल परवानाधारक यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
0 comments:
Post a Comment