Ads

भद्रावतीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रीवर पोलिसांचा छापा; १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती, जावेद शेख :- 
दि. 19 मे 2026 — शहरातील भद्रानाग वार्ड परिसरात सुरू असलेल्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध धंद्याला आळा घातला आहे. पोलीस स्टेशन भद्रावतीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून मोठ्या प्रमाणात तंबाखूचा साठा जप्त केला.Police raid on sale of banned flavored tobacco in Bhadravati; Goods worth Rs 1.08 lakh seized
या कारवाईत आकाश अरुण सहारे (वय 31, रा. भद्रावती, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, वैभव लांडे (रा. सुमठाणा, भद्रावती) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये मजा 108 हुक्का या नावाने विक्री होणारे प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचे तब्बल 38 बॉक्स (एकूण 760 टीन डब्बे) असा मोठा साठा असून, याची एकूण किंमत अंदाजे ₹1,08,300/- इतकी आहे.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप क्र. 589/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभाग वरोरा पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडली असून, परिसरात बेकायदेशीर तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायावर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment