Ads

“तलवारीसह दहशत माजवणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात; भद्रावतीत धडाकेबाज कारवाई!”

भद्रावती (प्रतिनिधी) जावेद शेख:
भद्रावती शहरातील दुधाळा तलाव परिसरात तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली. ही कारवाई दिनांक १८ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.“A young man who spread terror with a sword is caught by the police; Bhadravati police take swift action!”
पोलीस स्टेशन भद्रावती येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दुधाळा तलाव, किल्ला वॉर्ड परिसरात एक इसम हातात धारदार तलवार घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रितीक संतोष रामटेके (वय २६ वर्षे, रा. आंबेडकर चौक, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आहे. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ५,००० रुपये किंमतीची ८० सेंटीमीटर लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या तलवारीची मुठ स्टीलची असून ती अतिशय टोकदार व धोकादायक स्वरूपाची आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक ५८४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शोध पथकातील पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे व संतोष राठोड यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment