भद्रावती जावेद शेख : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालत भद्रावती पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. संताजी नगर परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या अल्पावधीत शोधून काढत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Blasting action: Bhadravati police uncover motorcycle theft case in just a few hours; Two accused arrested!
फिर्यादी प्रफुल पांडुरंग निगोट (वय ३१, रा. नांदा फाटा, ता. कोरपना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ मे रोजी रात्री त्यांच्या घराच्या अंगणात उभी केलेली Hero HF Deluxe (MH 34 CB 9935) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. १५ मे रोजी सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन भद्रावती येथे धाव घेतली.
तक्रारीवरून गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुखबिरांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात यश आले.
यामध्ये यमला तंगराज कोरवन (वय ४०) गोपाल जीवन मालाकार (वय ३०)दोन्ही रा. शाम नगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली मोटारसायकल (किंमत सुमारे ५०,००० रुपये) जप्त केली. तसेच तपासादरम्यान आणखी एका गुन्ह्यातील तब्बल २०,००० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
0 comments:
Post a Comment