Ads

पडोली पोलिसांची 24 तासांत कामगिरी! चोरीस गेलेली अ‍ॅक्टिव्हा जप्त, आरोपी जेरबंद

पडोली पोलिसांची 24 तासांत कामगिरी! चोरीस गेलेली अ‍ॅक्टिव्हा जप्त, आरोपी जेरबंद

चंद्रपूर : पडोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने यशवंतनगर परिसरातून चोरीस गेलेली होंडा अ‍ॅक्टिव्हा अवघ्या 24 तासांत शोधून काढत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.Padoli police's performance in 24 hours! Stolen Activa seized, accused arrested
दिनांक 15 मे 2026 रोजी फिर्यादी अदनान अकील खान (वय 26, रा. यशवंतनगर, चंद्रपूर) यांनी त्यांची एमएच 34 सीएल-1888 क्रमांकाची काळ्या रंगाची होंडा अ‍ॅक्टिव्हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पडोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. यावरून गुन्हा क्रमांक 224/2026, कलम 303(2) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांनी विशेष पथक तयार केले.
तपासादरम्यान 16 मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोरीस गेलेली अ‍ॅक्टिव्हा लखमापूर येथील टायर पंचर दुकानाजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गाडी जप्त केली व शुभम बिरण जाधव (वय 18, रा. चंद्रपूर) याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने दोन साथीदारांसह गाडी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी 1 लाख रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई डीबी पथक प्रमुख विनोद वानकर, पो. कॉ. प्रतिक हेमके, धिरज भोयर व समीर खाडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment