Ads

धडाकेबाज कारवाई : भद्रावतीत मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती जावेद शेख : पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. MH 34 P 1180) ही मोटारसायकल जप्त करण्यात आली असून एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Explosive action: Motorcycle theft case uncovered in Bhadravati; Two accused arrested, valuables worth Rs 50,000 seized
दिनांक १५ मे २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी यमला तंगराजन कोरवान (वय ४०) व गोपाल जीवन मालाकर (वय २६, दोन्ही रा. शाम नगर, चंद्रपूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक ५७४/२५ कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. सुनिल गौरकार यांच्या नेतृत्वाखाली पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इमान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment