Ads

🚨 “रेती माफियांवर धडक!”पारधी घाटात सकाळीच महसूल विभागाची कारवाई; अधिकाऱ्याची एकहाती धाडसी कामगिरी, ‘मोठे मासे’ अजूनही रडारबाहेर?

भद्रावती | जावेद शेख (प्रतिनिधी):-
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजा पारधी येथील घाट परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाने सकाळीच जोरदार धडक दिली. पारधी घाटाजवळील पाण्याच्या टाकीजवळ सकाळी सुमारे १० वाजता ही कारवाई करण्यात आली. “Sand mafia crackdown!”

Revenue department takes action in Pardhi Ghat in the morning; Single-handed bravery of an officer, ‘big fish’ still off the radar?
ही मोहीम तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, जाबाज ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक यांनी एकट्याच्या बळावर धाडसी पाऊल उचलत रेती माफियांना थेट भिडण्याचे काम केले.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर छापा टाकून बिना नंबरची गाडी (मालक – कार्तिक रमेश जीवतोडे, रा. शेगाव खुर्द) पकडण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, किशोर ढोक (रा. काटवल) याने दुसरी गाडी घटनास्थळावरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने तत्काळ कारवाई करत दोन्ही वाहनांवर गुन्हा (FIR) दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत विशेष बाब म्हणजे, महसूल अधिकाऱ्याने कोणत्याही दबावाला न जुमानता थेट कारवाई केल्याने त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मात्र, या घटनेनंतर नागरिकांकडून एक तीव्र प्रश्न उपस्थित होत आहे —
“लहान माशांवर कारवाई होतेय, पण पांढरपेशी ‘मोठे मासे’ कधी जाळ्यात अडकणार?”
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी सुरू असून काही प्रभावशाली लोकांच्या सहभागाबाबत चर्चा रंगत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता अशा ‘बड्या’ रेती माफियांवरही निर्णायक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.
👉 आता प्रशासन पुढे काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment