Ads

🐅 ताडोबात धुमाकूळ घालणारा ‘टी-87’ अखेर जेरबंद!; चार बळी घेणाऱ्या नरभक्षकावर वनविभागाची मोठी कारवाई

चंद्रपूर | प्रतिनिधी :-
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात गेल्या काही वर्षांपासून दहशत माजवणारा ‘टी-87’ हा नर बाघ अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. गुरुवारी (दि. 21 मे) मध्यरात्री ट्रॅन्क्विलायझर गनच्या साहाय्याने बाघाला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या पकडण्यात आले. या कारवाईनंतर परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
'T-87', which caused havoc in Tadoba, finally caught!; Forest Department takes major action against the cannibal that killed four
गेल्या चार वर्षांत या बाघाच्या हल्ल्यांमध्ये चार शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चंद्रपूर बफर क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने सापळा कॅमेरे (ट्रॅप कॅमेरे) लावून तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान सर्व घटनांमागे ‘टी-87’ हाच नर बाघ असल्याचे स्पष्ट झाले. 21 मे रोजी पेंढ-2 परिसरातील कंपार्टमेंट क्रमांक 639 मध्ये बाघाची उपस्थिती आढळल्यानंतर तात्काळ शोधमोहीम राबविण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर. वेलमे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व डॉ. कुंदन पोडचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जंगलात शोधकार्य केले. यावेळी शार्पशूटर अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत ट्रॅन्क्विलायझर डार्ट मारून बाघाला बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 या यशस्वी कारवाईमुळे आता परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, वनविभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment