Ads

रेती माफियांवर LCB चा दणका; 45 लाखांचा हायवा जप्त, चालक अटकेत

चंद्रपूर | प्रतिनिधी (दि. 28 मे 2026)
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी धडक कारवाई करत तब्बल 45.90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. LCB crackdown on sand mafia; 45 lakhs worth of khaiva seized, driver arrested
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बल्लारशहा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाची (रेती) चोरी करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला असता एक हायवा ट्रक रेतीसह ताब्यात घेण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गणेश शिवाजी कोरपल्लेवार (वय 25, रा. नारपठार, ता. जिवती) याला अटक केली आहे. तर वाहन मालक गोपीनाथ राठोड (रा. सारंगापूर, ता. जिवती) हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
 जप्त मुद्देमाल:
TATA Signa कंपनीचा हायवा ट्रक (क्र. MH 34 CQ 1190) – अंदाजे किंमत: ₹45,00,000
09 ब्रास रेती – अंदाजे किंमत: ₹90,000  एकूण जप्त मुद्देमाल: ₹45,90,000
सदर प्रकरणी बल्लारशहा पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध कलम 303(2), 49 बीएनएस, तसेच जमीन महसूल कायदा व मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी अशाच कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment