जावेद शेख | प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती तालुक्यातील चारगाव परिसरात अवैध रेती तस्करीविरोधात महसूल विभागाने मध्यरात्री टाकलेला सर्जिकल स्ट्राइक सध्या चर्चेचा आणि संशयाचा विषय ठरला आहे. एका बाजूला ट्रॅक्टर जप्तीची कारवाई होत असताना, दुसऱ्या बाजूला गाडी मालकाचे नाव गूढरित्या गायब ठेवल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.“Crackdown or ‘Selective’ Action? Midnight Surgical Strike by Revenue Department, but Owner’s Name Missing!”
मध्यरात्रीची अॅक्शन: ट्रॅक्टर जप्त, परवाना नाही!
2 जून 2026 रोजी रात्री सुमारे 12:15 वाजता विजासन परिसरात मंडळ अधिकारी अनिल दडमल आणि महसूल पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे विजासन माऊली मंदिर जवळ कारवाई केली.
रेतीने भरलेला MH 34 BE 9775 क्रमांकाचा ट्रॅक्टर (ट्रॉलीला नंबर नाही!) अडवून तपासणी केली असता, वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले.
यानंतर तात्काळ वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अनिल दडमल व खुशाल मस्के ड्रायव्हर बंडू वेलफुलवार यांनी ही कारवाई पार पडली.
मोठा प्रश्न: मालकाचे नाव लपवले का?
या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे –
👉 पंचनाम्यात फक्त चालकाचा उल्लेख, गाडी मालकाचा नाही!
याआधी महसूल विभाग प्रत्येक कारवाईत मालकाचे नाव जाहीर करत होता. मात्र यावेळी अचानक बदललेली भूमिका संशयाला वाव देत आहे.
गावात चर्चा: “हीच गाडी दुसऱ्यांदा पकडली!”
स्थानिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की, हीच ट्रॅक्टर-ट्रॉली यापूर्वीही पकडली गेली होती! तरीही पुन्हा त्याच पद्धतीने अवैध वाहतूक सुरू कशी?
यामुळे “कारवाई फक्त दिखावा आहे का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
*नंबर नसलेली ट्रॉली – प्रशासनाची नजर चुकली?
ट्रॅक्टरसोबत असलेल्या ट्रॉलीवर कोणताही नंबर नसणे ही गंभीर बाब असून, अशा वाहनांना मोकळेपणाने वावरण्याची मुभा कोण देत आहे? प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जनतेचा सवाल: पारदर्शकता कुठे हरवली?*
एकीकडे कारवाईचे स्वागत होत असताना, दुसरीकडे “मोठ्या माशांना वाचवण्यासाठी छोट्यांवर कारवाई?” अशी भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
0 comments:
Post a Comment