Ads

52 तासांचा जुगार अड्डा उधळला! एलसीबीची धडक कारवाई; 10 जण ताब्यात

चंद्रपूर, दि. ३ जून २०२६ : पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत अंधारी नदी परिसरातील रिव्हर व्ह्यू हॉटेल येथे तब्बल ५२ तासांपासून सुरू असलेला पत्त्यांचा जुगार अड्डा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उधळून लावला. या कारवाईत १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Gambling den busted! LCB’s major crackdown; 10 people detained
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ३ जून रोजी एलसीबीच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी काही इसम पत्त्यावर हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ४९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ₹५,१२,१४० इतकी रोख रक्कम, पत्त्यांचे ६ पाकीट (₹३००) तसेच एक जुनी दरी (₹१००) असा एकूण ₹५,१२,५४० किमतीचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब केशव मडके (रा. गडचिरोली) याच्यासह आणखी ९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर येथे सुरू आहे.
ही कारवाई चंद्रपूर व मूल येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. अचूक माहिती व नियोजनामुळे पोलिसांना ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडता आली.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला असून या घटनेमुळे जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment