Ads

एसटीला अवैध वाहतुकीचे ‘ग्रहण’; चंद्रपुरात २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’, १५ जूनपर्यंत धडक कारवाई

चंद्रपुर, प्रतिनिधी :
राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा वाढता परिणाम लक्षात घेता चंद्रपुर विभागात मोठी कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ लागू करत आजपासून १५ जूनपर्यंत धडक कारवाई केली जाणार आहे.ST  ‘Eclipse’ of illegal traffic;  Chandrapurat 200 meter 'no parking zone', strict action till 15th June
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या महसुलात मोठी घट होत असल्याचे वारंवार निदर्शनास आल्यानंतर ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष बैठकीत याबाबत गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत बसस्थानक परिसरात अनधिकृतपणे प्रवासी उचलणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना सहकार्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
चंद्रपुर विभागात सुरक्षा व दक्षता अधिकारी किरण नागमोते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबवली जाणार आहे. विभागातील अधिकारी, पर्यवेक्षक, आगार प्रशासन आणि स्थानिक पोलिस यांच्या समन्वयातून अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

चंद्रपुर मध्यवर्ती बसस्थानकासह राजुरा, मूल, भद्रावती, वरोरा, चिमूर, सावली आणि बल्लारपूर येथील बसस्थानक परिसरात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
बसस्थानकाबाहेर अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व दिले जात आहे.

अधिकृत सेवा वापरण्याचे आवाहन
“एसटीचे उत्पन्न वाढविणे आणि प्रवाशांना सुरक्षित, अधिकृत सेवा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणले जाईल,”  
  श्रीमती किरण नागमोते
 सुरक्षा व दक्षता अधिकारी चंद्रपूर विभाग

“एसटीच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’ची काटेकोर अंमलबजावणी करून अनधिकृत वाहतुकीवर आळा घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.प्रवाशांनी अधिकृत एसटी सेवेचा वापर करावा, ही नम्र विनंती आहे. तसेच स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि चालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. १५ जूनपर्यंत सुरू असलेल्या या विशेष मोहिमेमुळे निश्चितच एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित व विश्वासार्ह सेवा मिळेल,” असे अंकुश खाडिलकर आगार व्यवस्थापक चंद्रपूर आगार यांनी सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment