Ads

भद्रावतीत अवैध लेआऊटचा सुळसुळाट! ग्राहकांची फसवणूक; फौजदारी कारवाईची मागणी

भद्रावती, प्रतिनिधी जावेद शेख:
भद्रावती शहरात नगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, तसेच पक्के रस्ते, नाली, वीज व पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत सुविधा न देता केवळ मुरूम टाकून रस्त्यांचा आव आणत अवैध पद्धतीने प्लॉट विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित लेआऊट धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामोजवार यांनी केली आहे.Illegal layout in Bhadravat!  Customer fraud;  demand for criminal action
नामोजवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक लेआऊट धारक नगरपालिकेच्या नियमानुसार नाल्या, रस्ते किंवा इतर सुविधा न उभारता लेआऊट सजवून ग्राहकांना आकर्षित करतात व त्यांची दिशाभूल करून प्लॉट विक्री करतात. परिणामी नागरिकांची फसवणूक होत असून, नंतर या भागांमध्ये विकासकामांसाठी नगरपालिकेला मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो.
याशिवाय, विकासकामे वेळेत न झाल्यास नागरिकांचा रोष नगरपालिकेवर व नगरसेवकांवर व्यक्त होतो, तर लेआऊट मालक मात्र प्लॉट विकून नफा कमावून मोकळे होतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.
शासनाच्या नवीन नियमानुसार अधिकृत परवानगीशिवाय प्लॉट विक्री करता येत नाही. तरीदेखील काही लेआऊट धारक नोटरीच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवहार करून नागरिकांना फसवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर भद्रावती शहरातील सर्व संशयित लेआऊटची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन मुख्याधिकारी, नगर परिषद भद्रावती यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ. सरिता सूर, नगरसेविका सौ. पल्लवी तामगडे, नगरसेवक अनिल पडोळे व नगरसेवक प्रथम गेडाम उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment