Ads

चंद्रपूर जिल्ह्यात युवासेना आयोजित जिल्हास्तरीय 'सडेतोड' वक्तृत्व स्पर्धा; आकर्षक बक्षिसे आणि विनामूल्य प्रवेश

चंद्रपूर : स्वाभिमान, धैर्य आणि जनसेवा यांचा संदेश देणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहेत. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजेच १०० वे जन्मवर्ष सुरू झाले असून या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
District-level ‘Sadetod’ Oratory Competition organized by Yuva Sena in Chandrapur; Attractive prizes and free entry
 याच गौरवशाली पर्वाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण वक्त्यांना आणि विद्यार्थ्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एका भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे आणि युवासेना शिवसेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेवक हर्षलदादा काकडे व युवासेना राज्य विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या सूचनेनुसार ही स्पर्धा आकारास येत आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या धडाडीच्या नेतृत्वात युवासेना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने या भव्य "सडेतोड वक्तृत्व स्पर्धा – २०२६" चे आयोजन करण्यात आले असून "युवकांचे विचार... महाराष्ट्र घडवणार!" हा या स्पर्धेचा मुख्य गाभा आहे.

येत्या रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील वरोरा नाका, नागपूर रोड येथील श्रमिक पत्रकार भवन येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही स्पर्धा पार पडणार आहे. तरुणाईच्या बौद्धिक आणि वैचारिक पातळीला आव्हान देण्यासाठी या स्पर्धेत 'व्हिजन महाराष्ट्र २०५०' आणि 'राजकारण आणि समाजकारण युवकांची भूमिका' हे दोन अत्यंत महत्त्वाचे व कळीचे विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ ते ३५ वर्षे वयोगटाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक स्पर्धकाला आपले सडेतोड विचार मांडण्यासाठी एकूण १० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. विशेष म्हणजे वक्तृत्व क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे प्रवेश शुल्क पूर्णपणे निशुल्क म्हणजेच विनामूल्य ठेवण्यात आले आहे.

या भव्य जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला १०,००० रुपये रोख, द्वितीय क्रमांकाला ५,००० रुपये रोख आणि तृतीय क्रमांकाला ३,००० रुपये रोख अशा आकर्षक बक्षिसांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, सोबतच स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक वक्त्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक आणि वक्तृत्व क्षेत्रात आवड असणाऱ्या सर्व इच्छुकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन आपल्या वाणीची आणि विचारांची ताकद सिद्ध करावी, असे जाहीर आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी केले आहे. स्पर्धेतील नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी स्वप्नील पाटील यांच्याशी ७६२०७०६५६९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment