Ads

घोडपेठ येथे भीषण अपघात; हेल्मेट असूनही दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती : भद्रावती-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील घोडपेठ येथे रविवारी (दि. १९ जुलै) दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीमुळे (चुरी) दुचाकी घसरल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.Horrific accident at Ghodpeth; Biker dies on the spot despite wearing helmet

मृतकाचे नाव अनिल सुधाकर बावणे (रा. शिवाजीनगर, भद्रावती) असे असून, ते आपल्या अॅक्टिवा (क्रमांक MH-34-CS-7875) यात दुचाकीने भद्रावतीहून चंद्रपूरकडे ड्युटीवर जात होते. घोडपेठ परिसरात महामार्गावर रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीवरून दुचाकीचा ताबा सुटल्याने वाहन घसरले. त्याचवेळी मागून येत असलेल्या ट्रक (क्रमांक RJ-17-CB-3519) खाली ते आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातातील विशेष बाब म्हणजे अनिल बावणे यांनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की हेल्मेटचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. हेल्मेट असूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही, यामुळे अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतकला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे 265 आणण्यात आलेअपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.

रस्त्यावर पडलेली बारीक गिट्टी हा अपघातास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, याबाबत सखोल तपास सुरू आहे. संबंधित ट्रक, चालक तसेच अपघाताच्या सर्व परिस्थितीची चौकशी ठाणेदार योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत असून, पुढील तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment