पोंभुर्णा | प्रतिनिधी
ग्रामीण पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध समस्या शासन-प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, पत्रकारांवरील अन्याय व हल्ल्यांविरोधात संघटितपणे लढा उभारणे तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, पोंभुर्णा तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड उत्साहात पार पडली.
Rupesh Nimsarkar unanimously elected as Taluka President; Determination to further empower the organization for the rights of rural journalists
या निवड प्रक्रियेस महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ संघटक तथा जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण, जिल्हा सचिव विनोद पन्नासे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, माजी निवासी जिल्हाधिकारी बडगेलवार, पत्रकार दुर्योधन घोंगडे तसेच तालुक्यातील अनेक ग्रामीण पत्रकार उपस्थित होते.
निवड प्रक्रियेत सर्वानुमते रुपेश निमसरकर यांची तालुकाध्यक्ष, जीवनदास गेडाम यांची कार्याध्यक्ष, सुरेश कोमावार यांची सचिव, विकास शेडमाके यांची उपाध्यक्ष, सचिन मडावी यांची कोषाध्यक्ष, महेश श्रीगिरीवार यांची सहसचिव, तर किशोर मोहोरकर, अतुल भडके, राकेश मेश्राम, धनराज कोवे आणि दुर्योधन घोंगडे यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला असून, पत्रकारांवर अन्याय झाल्यास संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांना वैयक्तिक अथवा व्यावसायिक कोणतीही अडचण निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी संघटना सदैव तत्पर राहील. ग्रामीण पत्रकारांनी निर्भीड, निःपक्ष आणि जबाबदार पत्रकारिता करत संघटित राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सचिव विनोद पन्नासे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे तसेच माजी निवासी जिल्हाधिकारी बडगेलवार यांनीही पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. बदलत्या काळातील पत्रकारितेची आव्हाने, पत्रकारांचे अधिकार, कायदेशीर बाबी, व्यावसायिक नैतिकता आणि संघटितपणे कार्य करण्याचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले.
उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पत्रकारांवरील वाढते हल्ले, खोटे गुन्हे, शासकीय कार्यालयांतील अडथळे तसेच ग्रामीण पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रुपेश निमसरकर यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले. तालुक्यातील सर्व ग्रामीण पत्रकारांना सोबत घेऊन संघटना अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी कार्य करणार असून, पत्रकारांच्या सामाजिक, व्यावसायिक आणि कायदेशीर प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
0 comments:
Post a Comment